Terms & Conditions

१) नोंदणी करण्यासाठी प्रथम संस्थेचे मुख्य कार्यालय दादर येथे भेट द्या.

२) वार्षिक वर्गणी रु १००० भरल्यानंतर एका आठवड्यात लॉगिन व पासवर्ड दिला जाईल.

३) एक वर्षानंतर जर आपण त्याचे नूतनीकरण केले नाही तर आपली नोंदणी रद्द केली जाईल.

४) आपणास दिलेला लॉगिन व पासवर्ड दुसऱ्याला देऊ नये.

५) संस्था फक्त वधू वराची माहिती देणार असून वधू वराची पत्रिका स्वतः घ्यावी व चौकशी स्वतः करावी. जर वधू वराने संस्थेला चुकीची माहिती दिली असल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.

६) वधू वराची माहिती पडताळून पाहणे आपणास बंधनकारक आहे.

७) जर आपणास माहिती मध्ये बदल करावयाचा असल्यास आपण स्वतः करू शकता.

८) लग्न जमल्यास आपण संस्थेला त्वरित कळविणे.व त्यानंतर नोंदणी रद्द केली जाईल.

९) संस्था समाज सेवा करत आहे,लग्न जमल्यास आपण स्वखुशीने संस्थेला देणगी द्यावी.

१०) संस्थेच्या कार्यालयीन वेळेत संपर्क साधला तर आपणास त्वरित व योग्य माहिती दिली जाईल.

११) नाव नोंदणी साठी दोन पासपोर्ट फोटो व वधू वराची माहिती घेऊन येणे.

१२) जर आपण मुंबई बाहेर राहत असल्यास संस्थेच्या कार्यालयात येऊ शकत नसाल तर आपण बँकमध्ये पैसे भरून माहिती कार्यालयात पोस्टाने किंवा इमेलने पाठवू शकता त्यासाठी कृपया कार्यालयीन वेळेत आपण संपर्क साधा.