About Us

१९६० च्या दशकात कळसुली गावचा एक शिक्षकी पेशातील तरुण आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आला, मुंबई महागरपालिकेत नोकरीला लागला, चरितार्थाची भ्रांत मिटली. परंतु चरितार्थ हे उद्दिष्ट नजरेसमोर न ठेवता समाजबांधवांचे आपण काहीतरी देणे लागतो असे मनाशी ठरवून ज्ञाती बांधवाना एकत्र करून दि. २२ डिसेंबर १९६३ रोजी 'परब मराठा समाज, मुंबई' हि संस्था स्थापना केली. तो तरुण म्हणजे आपल्या संस्थेचे आद्य प्रवर्तक कै. पांडुरंग श्रीधर परब (गुरुजी) होय. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ! सन १९६३ पासून आजपर्यँत अनेक समाजबांधवांनी त्यांना सहकार्य केले. त्या सर्व समाजबांधवांना मानाचा मुजरा.

सन २०२३ साली समाजाचा हिरक महोत्सव होऊ घातला आहे. हिरक महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान कार्यकारिणीने ज्ञाती बांधव संपर्क अभियान यापुढेही राबविण्याचे ठरविले आहे. याद्वारे महाराष्ट्र, गोवा, पुणे, बेळगाव, गुजरात तसेच मुंबईसह सिंधुदुर्गातील प्रत्येक गावागावात जाऊन सभासद नोंदणी करणे, संस्थेची ध्येय धोरणे, उद्दिष्टे ज्ञाती बांधवांपर्यंत पोहचवणे, जाती समाजातील जे परब बांधव राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, वैद्यकीय इत्यादी विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत त्यांना मूळ प्रवाहात सामील करून घेणे, जेणे करून त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा आपल्या इतर समाजबांधवांना घेता येईल आणि त्यातूनच आपला समाज मोठा होणार आहे. समाज मोठा होणे म्हणजे ज्ञाती बांधवांची वैचारिक, सामाजिक व आर्थिक उंची वाढणे हे होय.

परब को. क्रेडिट सोसायटी लि :- हि सहकारी तत्वावर चालणारी आर्थिक संस्था असून तिचे खेळते भांडवल आज दोन कोटी इतके आहे. समाज बांधवाना वाजवी दरात कर्जपुरवठा करूनही हि संस्था हे एक समाजकार्यच करीत आहे.

शिक्षण सेवा मुंबई :- ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या व इतर समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करणे तसेच १०वी व १२वीच्या आपल्या व इतर समाजातील मुलांना करिअर, शिबिराद्वारे मार्गदर्शन केले जाते. मुलांचा रोख पारितोषिक देऊन गौरव केले जातो.

बालविकास व्यायाम मंदिर :- हि संस्था ३८ वर्षे घाटकोपर येथे मध्यमवर्गीय समाजातील मुलांना वाजवी शुल्क घेऊन शरीर सुदृढ बनविण्याचे शिक्षण देत आहे. ह्या व्यायामशाळेत सुमारे ३०० तरुण व्यायामाचे शिक्षण घेत आहेत. हि व्यायामशाळा समाजाच्या स्वमालकीच्या जागेत आहे.

उच्चशिक्षण निधी उपक्रम :- ह्या उपक्रमाद्वारे समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा केला जातो. (फक्त परब मराठा बांधवांसाठी)

आरोग्यनिधी उपक्रम :- ह्या उपक्रमाद्वारे समाजातील ज्ञाती बांधवाना व त्यांच्या नातेवाईकांना असाध्य आजारपणाच्या इलाजासाठी मदत केली जाते. संस्थेचा निधी हिरक महोत्सवी वर्षापर्यंत रु. ५०लक्ष पर्यंत वाढविण्याचा संकल्प केलेला आहे. (फक्त परब मराठा बांधवांसाठी)

महिला विभाग :- समाजाच्या महिला विभागातर्फे प्रतिवर्षी बालदिन, जागतिक महिला दिन, हळदी कुंकू, सागरी सहल असे विविध उपक्रम राबविले जातात.